Posts

महसुल पथकाच्या सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपी सह १७ लाखाचे टिप्पर जप्त

Image
मंठा-प्रतिनिधी सुभाष वायळ . तालुक्यातील सासखेडा येथे दि. ११/०४/२२ रोजी दु ०२:०० वाजता येथील जिल्हा परीषद शाळे समोर अवैध रित्या साठवुन ठेवलेल्या वाळु साठ्यातुन वाळु भरतांना टिप्पर क्रमांक MH-21BG-4027 चे चालक व मालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जण हे महसुल पथकातील तलाठी महेंद्र प्रभाकर साळवे तलाठी सज्जा दुधा ता मंठा जि जालना यांना अवैध रीत्या वाळु भरतांना आडळुन आले महसुल पथकातील तलाठी कारवाई करतील म्हणुन टिप्पर चालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जणांनी तलाठी साळवे यांना धमदाटी करून टिप्पर मधील वाळु खाली करून तेथुन पळुन गेले.म्हणुन तहसीलदार मंठा यांच्या आदेशाने तलाठी साळवे यांनी सदरील आरोपींच्या विरूद्ध मंठा पोलीस ठाणे येथे सरकारी कामात अडथळा व अवैध वाळु चोरीचा गुन्हा दाखल केला आहे यात आरोपी (१)पवन सुभाष राठोड वय २४ वर्ष रा नायगांव ता मंठा टिप्पर चालक यास ताब्यात घेवुन टिप्पर चालकाच्या म्हणण्याप्रमाणे टिप्पर मालक विजय उत्तम चव्हाण वय ४२ वर्ष रा हिवरखेडा सध्याचा पत्ता तळणी फाटा रोहाऊस यांच्या राहत्या घरासमोरून टिप्पर क्रमांक MH-21-BG-4027 हे टिप्पर ज्याची अंदाजीत किंम...

झोयाअनम चा पहिला रोजा

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतुर येथील नाईकवाडी गल्ली येथील रहिवासी झोयाअनम शेख जफर या चिमुकुलीने जीवनातील पहीला रोजा ठेवल्याने  परिसरातील  भरभरुन कौतुक केले रखरखत्या उन्हात या लहान चिमुकुलीने जीवनातील पहीला रोजा पूूर्ण केला रोजेचीं रूढी परंपरा असल्याने मुस्लिम समाजातील लहान लहान मुले मुली रोजा ठेवतात व आपल्या जीवनात सुख समृद्धी भेटवे अशि ईश्वर चरणी प्रार्थना करीत आल्हा कडे नत्मसतक होऊन प्रार्थना करतात सगळ्यासाठी दुवा ची मागणी करुन रोझा उघडतात।

शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलींचा सत्कार संम्पन

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे बळीराजा करिअर अकॅडमी,खरपुडी जि. जालना या संस्थेच्या वतीने ई. 11 व 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी कोचिंग क्लास घेण्यात येणार आहेत. यामध्ये NEET, JEE, MHCET या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेने जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली होती.             या कठीण असलेल्या परीक्षेत आनंद माध्यमिक विद्यालय परतूर च्या विद्यार्थिनी झाशी राजेभाऊ जगताप , श्रावणी राजकुमार तांगडे , पूजा भारत मंडपे या उत्तीर्ण झाल्या. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक प्रशांत वेडेकर , अनुसया गारकर , विक्रम भांडवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थान राजकुमार तांगडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेभाऊ जगताप , एकनाथ कदम उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजकुमार तांगडे म्हणाले की, मुलीच्या यशस्वीते बद्दल आई-वडिलांचा सत्कार होणे याचे मोल होऊ शकत नाही.या यशाचे श्रेय शिक्षक व मुलींचे आहे. यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर शिक्क...

राज्यातील दोन लाखावर नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी दोन मे 22 पासून करणार बेमुदत काम बंद आंदोलन ....प्रलंबित मागण्याबाबत प्रदीर्घ काळापासून सरकार तोडगा काढत नसल्याने घेतला आंदोलनाचा पवित्रा......

प्रतिनिधी हनुमंत दवांडे  महाराष्ट्रातील 400 पेक्षा जास्त नगरपालिका व नगरपंचायतीचे दोन लाखापेक्षा जास्त कर्मचारी 2 मे 22 पासून महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे.  महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने व नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ऑनलाइन बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय कायम केला आहे...  2 सप्टेंबर 2021 रोजी नगरपालिका प्रशासन मुंबई यांच्याबरोबरच प्रदीर्घ बैठक होऊन त्याबाबत आश्वासने दिली मात्र ठोस कारवाई केली नाही.  दरम्यानच्या काळात संघर्ष समितीने वेळोवेळी नगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व नगरविकास मंत्र्यांकडे या मागण्यांबाबत पाठपुरावा केला परंतु मागण्यांबाबत ठोस निर्णय झालेला नाही.  राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला शंभर टक्के वेतन कोषागार मार्फत मिळावे, राज्य सरकारने सहाय्यक वेतन अनुदान ऐवजी वेतन अनुदान मंजूर करावे ,दहा- वीस -तीस वर्ष...

दुकान जळीत प्रकरणी आकात यांनी केली 21 हजारांची मदत

Image
परतूर प्रतिनधी हनुमंत दंवडे दि.२७ - शॉर्टसर्किटने किराणा दुकानास आग लागून मोठे नुकसान झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल आकात यांनी दुकानदार शेख अयाज यांना 21 हजार 101 रुपयांची आर्थिक मदत केली.यामुळे पीडित दुकानदारास दिलासा मिळाला.    शहरातील गाव भागातील लड्डा कॉलनीत शेख अयाज यांचे किराणा दुकान आहे.या दुकानावरच शेख यांची उपजीविका चालते.परंतु सोमवारी (दि.25) अचानक शॉटसर्किट होऊन दुकानास आग लागली.क्षणार्धात आग संपूर्ण दुकानात पसरून दुकानातील किराणा सामान जळून खाक झाले.त्यामुळे करावे तरी काय असा प्रश्न शेख यांना पडला.उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते हतबल झाले.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कपिल भैया आकात यांच्या कानावर टाकली.आकात यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेख अयाज यांना 21101/- रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे शेख यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.  यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक काळे,नगरसेवक अंकुशराव तेलगड, अखिल काजी,विजय राखे, आरेफ अली, रियाज कुरेशी,...

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मध्ये होणाऱ्या सभेला परवानगी न देण्याची मागणी., परवानगी दिल्यास आत्मदहन करणार मंठा येथे नागरिकांनी दिले निवेदन.

Image
मंठा - सुभाष वायाळ दि.२७ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न देण्याची मागणी मंठा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले की सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सत्तेच्या स्वार्थासाठी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे.जातीवादी चे राजकारण करीत आहे.व शांत महाराष्ट्र राज्याला पेटविण्याचे काम करीत आहे. मुंबई येथिल सभेत त्यांनी मुस्लिम समाजाच्या मस्जिद वरील भोंग्याबबात व अजान बाबत नवा वाद निर्माण करुन सभेत प्रक्षोभक भाषण करुन हिंदु मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.व समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या आहे. राज ठाकरे भर सभेत मुस्लीम समाजाच्या विरोधात चेतावनी खोर भाषण खुले आम करीत आहे. व पवित्र अजानच्या विरोधात मस्जिदीसमोर भोंगे लावुन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याची धमकी देत आहे.त्यामुळे हिंदु मुस्लीम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करुन महाराष्...

टेम्पो - हायवाची जोरदार धडकतळणी- लोणार मार्गावर अपघात : टेम्पोतील चालकाचा मृत्यू

Image
 तळणि प्रतीनीधी रवि पाटील तळणीकर तळणी : टेम्पो- हायवाची समोरासमोर जोरदार धडक होऊन टेम्पोच्या चालकांचा मृत्यू तर हायवातील चालक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री ११ वा. तळणी - लोणार मार्गावरील वडगांव सरहद्द पाटीजवळ घडला.    सचिन खंदारे कानडी       नवनाथा कोकाटे लोणारकडे जाणा-या हायवा क्र . एम एच २१ बी यु ८८५५ व तळणीकडे येणाऱ्या टेम्पो क्र. एम एच ३७ बी १७२४ यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात टेम्पो चालक सचिन विष्णू खंदारे ( २२ वर्ष ) रा. कानडी, ता. मंठा यांच्या मृत्यू झाला. तर हायवातील चालक जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच तळणी चौकीचे पोलीस नाईक रखमाजी मुंडे व पोलीस कॉन्स्टेबल जी एस कातकडे महसूलचे तलाठी नितीन चिंचोले यांनी घटनास्थळावर भेट देऊन जखमींना उपचारासाठी हलवले तर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. वाळू वाहतुकीचा दुसरा बळी ... गेल्या चार दिवसातील हा दुसरा अपघाती बळी असून दहीफळ खंदारे येथील नवनाथ कोकाटे या विस वर्षीय तरुणाचा सुध्दा उपचारादरम्यान मूत्यू झाला मागच्या महीन्यात जास्त मागणी नसल्याने शेगाव पं...