सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

खांडवीवाडी येथील जि.प.शाळेत जंयती साजरी

परतूर (प्रतीनीधी)12 जानेवारी रोजी राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवीवाडी येथे जंयती साजरी करण्यात आली
या प्रसंगि  शाळेत आनेक विद्यार्थानी जयंती निमित्त आपले  मनोगत व्यक्त केले आजच्या काळातील जिजाबाईने कश्या प्रकारे वागावे व कश्या प्रकारे कार्य करायवे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले या जिजाउनी  आज जर पाहिले तर कोणत्याही क्षेत्रात मुलींना प्राधान्य आहे हे त्यांच्या मनोगतातून  व  उत्कृष भुमिकेतून संभाषण करून दाखवले 
              सक्सेस कोचिंग क्लासेस परतूरचे गजानन राहेकर सर यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.  यावेळी  मुख्याध्यापक.  सुदेवाड सर , भांडवलकर सर , सोनपेठ मॅडम, सतीश सर , निर्वल सर , गजानन सर, पाठक सर शाळेत सतत सहकार्य करणारे रोहिदास शेळके वीद्यार्थी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत