धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.
जालना प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...