सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

कपिल आकात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रोहीणा( बू) येथील अनेक तरुणांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश..


परतूर (हनुमंत दवंडे)दि 31रोजी परतुर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल  आकात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व संघटक अबुद चाऊस, प्रा.डॉ पंडित गाते सर, वैजनाथ गवळी, हरीभाऊ मानवतकरम यांच्या मार्गदर्शनाखाली रोहीणा (बु) येथील अध्यक्ष.प्रेम गवळी ,  ऊप अध्यक्ष सुमीत प्रधान, व सचिव. रामेश्वर काकडे, अर्जुन काळदाते, राम गवळी, ज्ञानेश्वर काकडे, अशोक वाघमारे, रामभाऊ गवळी, पांडुरंग गाते, गजानन गाते, गजानन राऊत, गोवर्धन भालेकर, ब्रम्हदेव डोने, नारायण काळदाते, महेश डोने, दत्ता गवळी  दत्ता गुजाळ केशव काळदाते यांच्या सह अनेक युवकांनी युवा नेते कपिल अकात यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला
या वेळी युवा नेते कपिल  आकात यांनी युवकांचा सत्कार केला व सर्वांना शुभेच्छा दिल्या

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत