सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

अखेर आज डेमु पॅसेंजर ला पारडगाव रेल्वे स्टेशन थांबा मिळाला..


परतूर ( हनुमंत दवंडे)
घनसावंगी तालुक्यातील पारड गाव या ठिकाणी
       मागील 1 महिन्यापासून डेमू पॅसेंजर गाडी चालू झाली होती .परंतु ही  गाडी पारडंगाव येथे थांबत नव्हती .यासाठी ग्रामस्थांकडून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे थांब्यासाठी मागणी करण्यात आली होती..
        आज थांबा मिळाल्यानंतर समस्थ ग्रामस्थांच्या वतीने  पायलट मिनाज सर व गाडीस हार घालून स्वागत करण्यात आले.
               ग्रामस्थांच्या वतीने रेल्वे प्रशासन व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले....
     यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भालेकर, पत्रकार नजीर कुरेशी , रामेश्वर ढेरे , दिगंबर ढेरे, बाबा सय्यद , प्रसाद सुतार , भारत काळे , पुंजाराम मंडपे , अब्दुल रहीम,  अंबादास वढे , संभाजी ताठे, पवन भारस्कर , ज्ञानराज भालेकर , अक्षय आढाव ,रितेश वैष्णव , माऊली गायकवाड , सत्तर भाई, अब्दुल हक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत