न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

येनोरा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. अरुणा अर्जुन दवंडे यांची निवड




परतूर  (हनुमंत तुकाराम दवंडे) तालुक्यातील येनोरा  येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अरुणा अर्जुन दवंडे उपाध्यक्षपदी सिद्धार्थ सोपान साळवे यांची निवड  करण्यात आली आहे. पालक सभेतून निवडलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे. मंगळवारी शालेय व्यवस्थापन समितीची बैठक सरपंच सरपंच विष्णू आसाराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी किसन गाडेकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार केला आहे.
       पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच विष्णू आसाराम गायकवाड,,  मुख्याध्यापक शिवाजी किसन गाडेकर, व गावकरी यांची उपस्थिती होती.
 सदस्य म्हणून ,संगीता नामदेव गायकवाड ,गोविंद पाराजी गायकवाड,सुनीता भीमराव साळवे,रेखा आसाराम घोडे,भागवत रामकिसन भुंबर,अशोक शंकर शेळके,अनिता सुभाष भुंबर, यशोदा साहेबराव भुंबर, संगीता शरद साळवे, नारायण काशीनाथ भुंबर, पांडुरंग कोंडीबा भुंबर,  ,रुख्मिण विठ्ठल भुंबर,देवराव नत्थुजी सोनवाने, मोनिका मदन जोगदंड ,हरिओम जयवंत भुंबर सचिव म्हणून शिवाजी किसन गाडेकर,शिक्षण तज्ञ म्हणून भास्कर बळीराम साळवे यांची निवड करण्यात आली . मुख्याध्यापक व गावातील सरपंच
यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत