सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा 
न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
 नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत