सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सावरगाव बुद्रुक ते कुंभार पिंपळगाव कडे जाणारा रस्ता अतिक्रमण ग्रस्त मोकळा करण्यात आला.


प्रतिनिधी /हनुमंत दवंडे

परतूर तालुक्यातील सावरगाव (बुद्रुक) येथील सावरगाव बुद्रुक ते कुंभार पिंपळगाव कडे जाणारा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अतिक्रमण ग्रस्त होता तो तहसीलदार मॅडम यांच्या आदेशाने मोकळा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षापासून अतिक्रमण असलेला रस्ता, शेतकऱ्यांचे व पिंपळगाव कडे जाणाऱ्या लोकांचे झालेले हाल या कारवाईमुळे संपुष्टात आले. गेल्या दोन वर्षापासून शेतामध्ये तयार झालेला माल व शेतीमध्ये नेण्यासाठी लागणारे खत अक्षरशः दुसऱ्या गावाहून शेतीमध्ये नवे लागत होते. शेतकऱ्यांना व मुक्या जनावरांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. या यातनेचा अंत पाहून सुमारे 40 शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार परतूर यांना निवेदन देऊन या वही वाटा प्रमाणे जाणारा अतिक्रमित रस्ता मोकळ्या करण्याची विनंती केली. तसेच माजी मंत्री व विद्यमान आमदार माननीय बबनराव जी लोणीकर साहेब व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री मंत्री युवा नेते माननीय राहुल भैया लोणीकर यांना वेतना व होणारे हाल शेतक-याने यांच्या निदर्शनास म्हणून दिले. माननीय बबनराव जी लोणीकर साहेबांनी व राहुल भैया लोणीकर साहेबांनी माननीय तहसीलदार साहेबांना फोन करून या व्यथा सांगितल्या तात्काळ तहसीलदार मॅडमनी अतिक्रमित रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. याकामी आष्टी महसूल मंडळ अधिकारी श्रीपाद मोताळे साहेब तसेच किशोर वावरे तलाठी सज्जा पिंपळी धामणगाव व आष्टी पोलिस स्टेशनचे पीआय माननीय नागवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार जे.डी. सुक्रे साहेब, एस .एस. काकडे साहेब, महिला कॉन्स्टेबल एस.एल कांदे मॅडम यांच्या उपस्थित
 मोलाची कामगिरी बजावून अर्धा किलोमीटर असलेला अतिक्रमित रस्ता रात्री तीन वाजेपर्यंत काम करून मोकळा करून दिला. गावकऱ्यांच्या वतीने या कारवाईबद्दल अभिनंदन व्यक्त करण्यात आले. शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी एक प्रकारचा श्वास मोकळा करण्यात आला. सर्व महसूल प्रशासनाचे, पोलीस प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे  गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत