ईसा संघटनेच्या मराठवाडा संघटक पदी पांडुरंग खराबे यांची निवड



 मंठा(सुभाष वायाळ )दि.04 मंठा येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व विठ्ठला पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे अध्यक्ष पांडुरंग खराबे पाटील यांची (ईसा) इंडिपेंडंट  इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्र, संघटनेच्या मराठवाडा संघटक पदी निवड करण्यात आली शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व  धडाडीचे प्रदेशाध्यक्ष भारत भांदरगे यांनी ही निवड केली त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की आपण संघटनेसाठी विविध शाळांना भेटी देऊन संघटन बांधणी साठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी व संघटने च्या ध्येयधोरणांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपली निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल श्री पांडुरंग खराबे यांची सर्वत्र अभिनंदन होत आहे पांडुरंग खराबे पाटील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून त्यांना नुकताच राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार ही मिळाला आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा हेलस चे सरपंच म्हणून ते काम पाहत असून अध्यात्म पर्यावरण क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये ही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान