सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी घवघवीत यश संपादन करणार-श्यामसुंदर शिंदे

प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
पाच राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून यापैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले असून या यशाबद्दल मौजे जिरडगाव तालुका घनसावंगी येथे जल्लोष करण्यात आला यावेळी बोलताना शामसुंदर शिंदे म्हणाले
 की आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी घवघवीत यश संपादन करून महा विकास आघाडीला पराभूत करणार असून घनसावंगी तालुक्यामध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर रा यांच्या नेतृत्वामध्ये तसेच युवा नेते राहुलभय्या लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार यश संपादन करून जिल्हा परिषद मध्ये भाजपाचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही असेही या वेळी शिंदे म्हणालेये तो अभी झाकी है, महाराष्ट्र बाकी है, जय श्रीराम या घोषणा देत आज (गुरूवार) जिरडगाव मध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड व पंजाब राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चार राज्यात बहुमत मिळाले. याबद्दल घनसावंगी तालुक्यातील जिरडगावात श्यामसुंदर पाटील शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शामसुंदर शिंदे सुरेशराव उगले किसन पाचणकर बाळासाहेब जाधव गोवर्धन उगले दादासाहेब उढाण महादेव उगले शिवाजीराव पाईकराव राहुल चंद्रे भावपूर्ण लक्ष्मण पाईकराव दासू उगले विनोद उगले छबुराव पाईकराव सोमेश उगले आदींसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत