सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पवित्र रमजान महिण्यात परतूर शहरात लोडशेटिंग करू नये, AIMIM चे निवेदन



परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे

परतूर शहरामध्ये लोडशेटिंग  चा नऊ तास ना घेणे परतूर शहरात दिवसातून नऊ तास वीजपुरवठा लोड शेटिंग करण्यात आली आहे ( एम आय एम शहराध्यक्ष सय्यद वसीम ) यांनी परतुर तालुक्या शहरात दिवसातून नऊ तास वीजपुरवठा घेण्यात येत आहे तरी सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे व वाढत्या उन्हाळ्यात तापमान ४० ३९ वाढलेला आहे व रोजेदार रमजानच्या महिन्यांमध्ये काठीन उपास धरून कामाला जात आहे व रात्रीच्या वेळी घरी आल्यानंतर लाईट गेल्यावर त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे लाईट गेल्यामुळे लोकांचा बेहाल  होत आहे  लक्षात घेऊन वारंवार खंडित होणारे विद्युत पुरवठा तत्काळ थांबवा असा निवेदन मा कार्यकारी अभियंता परतुर एम आय एम शहराध्यक्ष सय्यद वसीम  यांनी दिला आहे . निवेदन देते वेळी AIMIM चे परतूर शहराध्यक्ष सैय्यद वसीम अक्रम .ईसा अन्सारी . शेख नईम भाई .सैय्यद रशीद शेख अन्सार जमील  नायकवाडी व  कार्यकर्ते उपस्थित होते.  
 प्रतीलीपी , मा ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य, मा पालकमंत्री जालना ,मा मुख्य अभियंता औरंगाबाद, मा कार्यकारी अभियंता जालना, यांना देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत