सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर येथे भीम शाहिर साहेबराव येरेकर यांचा भीम गीताचा प्रबोधनपर कार्यक्रम

परतुर प्रतिनीधी हनूमत दंवडे
विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आर सी सी मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 
दिनांक   24 /04/2022 वार रविवार रोजी संध्याकाळी सात वाजता रेल्वे स्टेशन येथे प्रबोधनकार भीम शाहिर  साहेबराव येरेकर यांचा भीम गीताचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला आहे
       तरी तालुक्यातील सर्व भीम अनुयायांनी संविधान प्रेमी लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान आर सी सी मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळच्या वतीने करण्यात येते आहे
  

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत