सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर तालुका क्रीडा संयोजक पदी प्रमोद राठोड यांची निवड ,परतूर येथे तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२२-२३ नियोजन बैठक संपन्न

 परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण . 
      
परतूर: क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना तसेच तहसील कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालय परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने परतूर येथे तालुकास्तरीय शालेय तसेच क्रीडा स्पर्धा 2022-23 चे आयोजन व नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाली.

 या बैठकीस तालुका क्रीडा अधिकारी  रेखा परदेशी मॅडम,गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष साबळे साहेब, गटसमन्वयक   कल्याण बागल , निवृत्त क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी ,नवनियुक्त क्रीडा संयोजक  प्रमोद राठोड ,परतूर क्रीडा समितीचे अध्यक्ष निर्वळ सर आदी उपस्थित होते.

त्याच बरोबर परतूर तालुक्यातील विविध शाळेचे क्रीडा शिक्षक त्यामध्ये   काकडे व्ही जी,    कबाडी एस एल, कोरडे ए डी,   तन्वीर शेख,  नवल आर एम,   विकास काळे, राठोड व्ही एच, सरदार एन एस. गायकवाड व्ही एस, देवडे व्ही ए,  गिरी बी के,   खान माजीद परतुरी,   नलावडे एन एस, गीते जे एन,. सिरसाठ बी व्ही, श्री.आढे पीबी,श्री.भांडवलकर ए सी,  देशमुख के वाय,   कुकडे जी आर इत्यादी क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.

परतूर तालुक्यातील विविध शाळातून आलेले शारीरिक शिक्षक तसेच क्रीडा प्रेमी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या दहा क्रीडा स्पर्धेच्या आयोजना संदर्भात तसेच विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच दिवाळीच्या सुट्ट्यानंतर ९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान या दहा खेळ प्रकारांच्या स्पर्धा आयोजनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.


या बैठकीस तालुका क्रीडा अधिकारी, श्रीम रेखा परदेशी मॅडम यांनी क्रीडा विभागाच्या विविध योजना व क्रीडा स्पर्धा बाबत मार्गदर्शन केले तर निवृत्त क्रीडा संयोजक   सरफराज कायमखानी सर यांनी क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या बाबतीत मार्गदर्शन केले तर सर्वात शेवटी गटशिक्षणाधिकारी श्री.संतोष साबळे साहेब यांनी परतूर तालुक्यातील सर्वच शाळा यांनी क्रीडा स्पर्धा मध्ये सहभाग घ्यावा अशा सूचना तालुक्यातील मुख्याध्यापक यांना केल्या व परतूर तालुक्यातील सर्व क्रीडा स्पर्धा उत्कृष्ट पध्दतीने पार पाडू अशी ग्वाही सर्वानुमते देण्यात आली.
     
सदरील बैठकीत सूत्रसंचालन   जावेद पठाण सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत