सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा.सिध्दार्थ पानवले सन्मानित..

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 सामाजिक आणि क्षेत्रात कार्यरत असणार्या नवतरुणांपैकी एक प्रा.सिध्दार्थ पानवले यांचा औरंगाबाद येथील होल्डींग हँडस संस्थेतर्फे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने सन्मान करण्यात आला.
संस्थेतर्फे विविध क्षेत्रात आघाडीवर कार्यरत व्यक्तींचा सन्मान करण्याचे ठरविले. या प्रसंगी मान्यवर प्रा.डॉ.हृषिकेश कांबळे तहसिलदार राहुल गायकवाड,न्युरोसर्जन डॉ.जीवन राजपुत,जिल्हा माहीती अधिकारी मुकुंद चिलवंत,एमजीएम फिल्म ॲण्ड क्राफ्टचे शिव कदम तसेच संस्थापक अध्यक्ष सिरसीकर ,आण्णा वैद्य यांच्या हस्ते प्रा.सिध्दार्थ पानवले यांना स्मृतीचिन्ह देवुन सन्मानीत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत