सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर येथे शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 परतुर येथे शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट सरसेनापती मा.  स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश नळगे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला  बोलताना महेश नळगे यांनी सांगितले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आज महाराष्ट्रातील मराठी माणूस सुरक्षित असून त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्र हा प्रगतिशील झालेला आहे
        यावेळी शिवसेना वाहतूक संघटना तालुका अध्यक्ष रामजी सोळंके युवा तालुका समन्वयक राहुल कदम माजी शहराध्यक्ष गोविंद मुंदडा माजी युवा सेना शहर उपाध्यक्ष रूपेश व्होटकर संदिप पाचारे मंगेश भुसारे अनिल सोळंके गजानन मस्के विष्णूपंत सोळंके सचिन माकोडे बाबा मथुरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत