महाराष्ट्रात ४५ खासदार व २०० आमदार निवडून आणण्यासाठी "धन्यवाद मोदीजी" हे अभियान घरोघरी राबवा - माजी मंत्री बाबनरावलोणीकर,युवामोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून ०५ लाख पत्र पाठवण्याचा संकल्प- युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर


प्रतिनिधी  कैलाश चव्हाण 
देशात ४०० पेक्षा अधिक खासदार यावेळी भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार असून महाराष्ट्रातून ४५ खासदार व २०० आमदार निवडून आणण्यासाठी "धन्यवाद मोदीजी" हे अभियान घरोघरी जाऊन राबवावे त्यासाठी भाजपा युवा मोर्चा सर्व आघाड्या मोर्चे सेल चे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी राबवावे. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोककल्याणकारी सरकार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांच्या निदर्शनास आणून द्यावे व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील तर हवे असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे दुःख हाल अपेक्षा समजून घेणारा पंतप्रधान मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील केंद्र सरकारची प्रत्येक योजना ही लोककल्याणकारी योजना आहे प्रत्येक योजनेचा लाभ थेट त्याला भरताना व्यक्तिशः कसा होईल यासाठी पंतप्रधान मोदी सातत्याने प्रयत्नशील असतात त्यांना सर्वसामान्य जनतेचे दुःख माहीत आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोट्यावधी लोकांच्या गळ्यातील ताईत बनले असून केवळ मोदीजी हेच सर्वसामान्यांचे दुःख जाणून घेऊ शकतात असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.

श्री लोणीकर मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात आयोजित मंठा तालुका व नेरसिवली सर्कल मधील भाजपा व भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांशी "धन्यवाद मोदीजी" या उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शनपर बोलत होते. पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की देशातील कोट्यावधी लोकांचे स्वातंत्र्याचा ७० वर्षानंतर देखील बँकेमध्ये खाते उघडलेले नव्हते त्यामुळे जनधन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील नागरिकांचे बँक खाते उघडून शासकीय योजनांचा थेट लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा भ्रष्टाचार थांबला.

पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की स्वच्छ भारत अभियानांतर्गत पंचवार्षिक मध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचा कॅबिनेट मंत्री असताना ०१ कोटी लोकांना शौचालयाची बांधणी करून दिली परिणामी मोदीजींच्या संकल्पनेतून संपूर्ण देश स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे आला अत्यंत कल्पकतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना राबवत गोरगरीब लोकांना रुग्णालयाचा खर्च परवडत नाही म्हणून होणारे मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला ०५ लाख रुपयांचे कवच या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय पंतप्रधान मोदीजींनी घेतला व स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर पहिल्यांदा हे शेतकऱ्यांच सरकार असल्याची भावना सर्वसामान्य शेतकरी वर्गात निर्माण झाली.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मजबूत आणि आरसीसी घरे गोरगरिबांना देण्यात आली प्रत्येक बेघर माणसाला घर मिळावे हे मोदीजींचं स्वप्न शंभर टक्के पूर्णत्वाकडे जात असून लवकरच देशातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःच हक्काचं घर असेल त्याचप्रमाणे उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना चुलीवरील धुरापासून मुक्तता मिळाले तर गोरगरीब सर्वसामान्य लोकांना गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य देण्याचा क्रांतिकारी निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला व माझ्या देशातील एकही व्यक्ती उपाशीपोटी राहू नये ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावना सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली असेही लोणीकर यावेळी म्हणाले

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नल हर घर जल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक घरी नळाची जोडणी करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे तसेच सर्वांना वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौभाग्य योजना तर बेरोजगार तरुणांना आपला रोजगार स्वतः निर्माण करता यावा यासाठी कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण व मुद्रा योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून करण्यात आलं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानण्यासाठी धन्यवाद मोदीजी हा उपक्रम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी कडून राबवला जात असून त्यामध्ये युवा मोर्चा सर्व आघाड्या असेल प्रकाश यांनी सहभागी होत अधिकाधिक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवावेत असेही लोणीकर यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले
========================
भारतीय जनता युवा मोर्चा ची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचे जबाबदारी मिळाल्यानंतर पहिलाच उपक्रम "धन्यवाद मोदीजी" या रूपाने मिळाला असून महाराष्ट्रातून युवा मोर्चाच्या माध्यमातून ०५ लाखापेक्षा अधिक पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्याचा संकल्प आपण केला आहे त्या संकल्पच्या परिपूर्तीसाठी युवा मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन ज्या नागरिकांना माता भगिनींना केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला आहे त्या योजनांचा लाभार्थी म्हणून पंतप्रधान मोदींचे धन्यवाद मोदीजी या आशयाचे पत्र लिहून घ्यावे असे आवाहन नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले
=========================
धन्यवाद मोदीजी या उपक्रमासाठी आयोजित मंठा तालुका व नेर सेवली सर्कल मधील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीला उपस्थित लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी गणेशराव खवणे संदीप भैय्या गोरे सतीशराव निर्वळ राजेश मोरे प्रल्हादराव बोराडे (नेते, बाळासाहेबांची शिवसेना) पंजाबराव बोराडे माऊली शेजुळ जिजाबाई जाधव नागेशराव घारे कैलासराव बोराडे संभाजीराव खंदारे निवासराव देशमुख प्रसादराव बोराडे विठ्ठलराव काळे शिवदास हनवते उद्धवराव पवार दारासिंग चव्हाण प्रसादराव गडदे माऊली गोंडगे राजेभाऊ खराबे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अविनाश राठोड शेषनारायण दवणे विलास घोडके प्रल्हादराव सरकटे जगनराव टकले शिवराज तळेकर दिलीपराव पवार नितीन चाटे किशोर हनवते अंसाबाई राठोड राहुल बाहेकर अनंता वैद्य कपिल तिवारी सचिन राठोड रामकिसन अवचार दत्ता खराबे बाळासाहेब तौर शिवशंकर डोईफोडे नितीन सरकटे आनंद जाधव बंडू कव्हळे लहू आढे बाबाजी जाधव प्रकाशराव मुळे गोपीचंद पवार महेश पवार विवेक काकडे तुकाराम वैद्य आबासाहेब सरकटे गजानन शिंदे नवनाथ चट्टे भगवानराव सरकटे अशोक आप्पा सोनटक्के शरद मोरे गणेशराव खैरे शंकर बांडगे विजय घाडगे केतन चव्हाण स्वप्निल चव्हाण शुभम आढे यांच्यासह लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती