सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शेवगा येथील सरपंच व सदस्यांचा सर्वपक्षीय गावकर्‍यांच्या वतीने सत्कार संपन्न


परतूर प्रतिनिधी
तालुक्यातील शेवगा ग्रामपंचायतीची निवड प्रक्रिया हि बिनविरोध झाली निवड झालेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा शेवगा येथील सर्वपक्षीय गावकर्‍यांच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर मंगळवार रोजी श्री हनुमान मंदिर येथे भव्य नागरी सत्कार संपन्न झाला.
     यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना सांगितले की मी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असुन येणार्‍या काळात आपण सर्व गावकरी व सर्व पक्षीय मिळुन गावाचा विकास साधुयात.बिनविरोध निवडीबद्दल व सहकार्या बद्दल सरपंच व सदस्यांनी गावकर्‍यांचे व सर्वपक्षीयांचे यावेळी आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत