सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

खांडवी व खांडवीवाडी वि.वि. सोसायटीच्या चेअरमन पदी अंकुशराव बरकुले यांची चौथ्यादा तर आसाराम बरकुले यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
खांडवी सह खांडवीवांडी गावच्या संयुक्त सोसायटी चेअरमन पदाच्या निवडनुकीत माझे काकासाहेब अंकुशराव त्र्यंबकराव बरकुले (तात्या ) यांची सलग चौथ्यादा वेळस चेअरमन पदी तर आशीकराव रुस्तुमराव बरकुले यांची पहिल्यादा व्हाईस चेअरमन पदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली
       यावेळी दोन गावातुन तेरा सदस्य यांची देखिल बिनविरोध निवड करण्यात आली या मध्ये श्री जगननाथ बरकुले, श्री जनार्धानराव बरकुले ,श्री अंकुशराव बरकुले आशोकराव बरकुले श्री आकात लक्ष्मणराव,श्री आसाराम बरकुले श्री सुर्यकात बरकुले ,श्री भिमराव साळवे, श्री चोरघडे किशनराव श्रीमती पौळ कल्पना जितेंद ,श्रीमंती रुखमीनबाई आंबासाहेब श्री दत्ता मारोतीराव हारकळ तालुक्यातील सर्वत मोठी सोसायटी म्हणुन खांडवी सोसायटी कडे पाहिले जाते या सोसायटी मध्ये एकुन दोन गावे असल्याने मतादार संख्या देखिल जास्त आहे त्यामुळे या सोसायटी कडे सर्वचे लक्ष लागुण होते या बिनविरोध निवडीसाठी भाजपाचे रमेशराव भापकर श्री भुंजगराव बरकुले श्री संजयभाऊ अंभुरे मा संरपच विष्णूपंत बरकुले गणेश हारकळ विठ्ठलराव बरकुले दत्ताराव नारायण बरकुले उद्धवराव बरकुले हानुमान बरकुले श्री सुरदास बरकुले श्री शिवाजी पाईराव लक्मण शेळके रामेश्वर बरकुले रामदास शेरे यांनी प्रयत्न केले होते त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत