सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुर येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती जाहीर अध्यक्षपदी विष्णू मचाले,सचिवपदी रशीद बागवान


       परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रतिवर्षा प्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे.नवनिर्वाचीत समितीमध्ये अध्यक्षपदी विष्णू मचाले,सचिवपदी रशीद बागवान याची निवड करण्यात आली.
    परतूर येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी (ता.२९) रोजी शिवजन्मोत्सव समितीची निवड करण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे एकमताने ठरविण्यात आले.समितीचे उपाध्यक्षपदी विजय यादव,राहुल कदम ,कार्याध्यक्षपदी संदीप पाचारे, कोषाध्यक्षपदी शुभम कठोरे तर सहसचिव पदी सचिन माकोडे याचा समावेश आहे.यावेळी शिवसंग्राम चे तालुका अध्यक्ष सचीन खरात,
 रमेश सोळंके ,पांडुरंग नवल, महेश नळगे, संदीप जगताप, विनायक भिसे, विकास खरात, आशिष गारकर,भारत सवणे, विशाल पवार ,श्याम शिंदे, सिद्धेश्वर लहाने,शिवा पवार, अशोक तनपुरे, लक्ष्मण भिलारे, आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत