सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर येथे स् आनंद शाळेत टुडंट्स लीड कॉन्फरन्स उत्साहात संपन्न.

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
आनंद इंग्लिश स्कूल परतूर येथे पॉवर बाय लीड च्या मार्गदर्शनाखाली स्टुडंट्स लीड कॉन्फरन्स घेन्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन संजिवनीताई खालापुरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमच्या अध्यक्ष डॉ लता पुरी तर प्रमुख अतिथी म्हणून  डॉ.मनिषा कदम, प्रमुख पाहुणे सौ शोभा कदम , श्रीमती सत्यशीला तौर   होत्या.
विद्यार्थ्यांनी रोबोट ,अन्नसाखळी, सोलार सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, हृदयाची कार्यप्रणाली, सेव्ह अर्थ, पवनचक्की ,प्रकाश संश्लेषण क्रिया ,उष्णता मापक यंत्र ,एटीएम मशीन, चुंबकाचे परिणाम, सॅटॅलाइट कार्यप्रणाली, किडनी इत्यादी प्रयोगाचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यासाठी पालकांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाचे मोठ्या आत्मविश्वासाने सादरीकरण केले. परतुर शहरामधील कृतीतुन व प्रयोगातुन शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे आनंद इंग्लीश शाळा असे मत अनेक पालकांनी मांडले यावेळी.
 पालक व परतुर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‌ आलिया मॅडम , प्रास्ताविक अर्चना जाधव यांनी केले . तर आभार प्रदर्शन श्रीमती उषा मगर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत