सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

स्व.दर्शन देवावाले याच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबीर संपन्न

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
     स्व. दर्शन देवावाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ के.डी. फिटनेस जिम जालना येथे दि. ९ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी के डी फिटनेस जिम मित्र मंडळ , स्व. दर्शन देवावाले मित्र मंडळ तसेच रामनगर आणि शहराच्या इतर भागातील दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. तसेच स्मृती दिनाचे निमित्त जालना शहरातील पांजरापोळ गौशाळा येथे गौमाता साठी चारा दान करण्यात आले. यावेळी स्व दर्शन देवावाले यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य तरुणांची उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरामुळे ऐन उन्हाळ्यात गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास सहाय्य होणार आहे. यावेळी रक्त संकलनाचे कार्य जालना रक्तकेंद्र,जालना यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन योगेश देवावाले, अर्जुन देवावाले मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी दुर्गेश कठोटीवाले शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या कार्यक्रमात परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत