सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर शहरातील स्माशनभुमी करीता २५ लक्ष निधी च्या कामाचा शुभारंभ

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
परतूर शहरातील राजस्थानी स्मशानभूमी करिता शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नाने 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे .
सदरील कामाचे भूमिपूजन शहरातील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, माजी नगराध्यक्ष प्रदीप कुमार लड्डा, माहेश्वरी समाजाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पोरवाल, जैन समाजाचे तालुकाध्यक्ष आनंद कोटेचा, अग्रवाल समाजाचे तालुकाध्यक्ष गोविंद  मोर, राजेंद्र झवर , राजेंद्र मंत्री, पप्पू  दायमा, दिनेश बगडिया , रोशन बगडिया, राजेश मुंदडा , लखन जोशी , प्रणय मोर, शुभम कटोरे ,सौरभ बगडिया, निहित सकलेचा, दिलीप  नहार , दीपक  अग्रवाल, राधेश्यामजी मुंदडा ,श्याम  सोनी , सोपान कातारे, मधुकर निलेवाड ,शिवाजी तरवटे, दत्ता अंभोरे , नितीन राठोड ,गफार मिस्त्री , राजेंद्र कोटेजा ,यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. परतुर शहरातील विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणल्यचे मोहन अग्रवाल यांनी सांगीतल 

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत