Posts

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघच्या महाराष्ट्र संघटकपदी जालना येथील जालना समाचारचे संपादक  विकासकुमार बागडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटक  कैलास देशमुख यांनी एका नियुक्तीपत्रकाव्दारे केली आहे. विकासकुमार बागडी हे मागील 28 वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात  आहे. ते   पत्रकारांचे विविध प्रश्‍न व हितासाठी  काम करीत असून, त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना महाराष्ट्र संघटकपदाची जवाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात पत्रकारांची एकजुट करण्यासह त्यांच्या हितासाठी  काम करणार असल्याची ग्वाही नुतन महाराष्ट्र संघटक विकासकुमार बागडी यांनी दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफखान पठाण, केंद्रीय नियोजन समिती अध्यक्ष सुरेश सवळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, राष्ट्रीय महासचिव अशोक पवार, महाराष्ट्र...

लोणीकर पिता-पुत्रांचे कट्टर समर्थक नामदेव गोरे नगर परिषदेची निवडणुक लढविण्यास इच्छुक,आ.बबनराव लोणीकरांनी संधी दिल्यास सामाजिक कार्याच्या जिवावर नामदेव गोरे खेचुन आणु शकतात विजयश्री

Image
परतुर प्रतीनिधी संतोष शर्मा  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार तयारीच्या मुडमध्ये दिसत आहेत. अशात युवक नेते तथा आ. बबनराव लोणीकर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांचे कट्टर समर्थक नामदेव गोरे यांनी परतुर नगर परिषद प्रभाग सहा मधुन निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.    नामदेव गोरे हे गेल्या अनेक वर्षापासुन राजकारणात सक्रिय युवक नेते असुन नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम अग्रेसर राहुन समस्यांचे निराकारण करणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे नागरीकांसाठी निष्ठेने काम केले असून, दिलेला वेळ दाखविलेली निष्ठा आणि जनसंपर्क याच त्यांच्या उमेदवारीच्या प्रमुख ताकदी ठरतील, असा या प्रभागातील स्थानिकांचा विश्वास आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा कल आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पक्षाने व आ. बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांनी त्यांना संधी दिल्यास ते सामाजिक कार्याच्या जिवावर विजयश्री...

शिक्षकाचे स्थान हे देव्हार्यातील देवासारखे असले पाहिजे,निवृत्त शिक्षक अशोक कदम यांच्या निरोप समांरभ कार्यक्रमात डॉ पुरुषोतम भापकर यांचे प्रतिपादन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील   ऊस्वद देवठाणा येथील निवृत्त शिक्षक अशोक कदम यांचा आज उस्वद येथील व्यकेश्वर मंदिरात सेवागौरव समारंभा आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण आयुक्त पुरुषोतम भापकर बोलत होते .शिक्षकाने शिस्त क्षमता आणि कर्तव्यदक्षता या तीन गोष्टींनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे शिक्षक हा समाज व्यवस्थेतील एक प्रमुख कणा असून त्याच्यावर येणाऱ्या पिढीवर संस्कार करण्याचे काम शिक्षकांचे आहे शिक्षकाने समाजात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे ही काळाची गरज आहे आपल्या मुलावर संस्कार त्यांची बौद्धिक क्षमता शैक्षणिक क्षेत्रात असणारे त्यांचे योगदान यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्नशील असणे खूप गरजेचे आहे सध्याच्या या धकाधकीच्या युगात आपण आपल्या शरीर संपदेकडे दुर्लक्ष करत असल्यानेअनेक व्याधींनीग्रस्त होत आहे आपल्या पाल्यांना व्यायामाची सवय लावणे सध्या गरजेचे आहे महाराष्ट्रात शिक्षण आयुक्त म्हणून काम करत असताना अडीच कोटी मुलं सात लाखाहून शिक्षक व एक लाखभर शाळा यांचे नेतृत्व करण्याची संधी मला शिक्षण आयुक्त असताना मिळाली त्या संधीचे सोने करत शिक्षण क्षेत्रात महार...

प्रतीक्षा संपली नगरपालीका,नगर पंचायतचे बीगूल वाजले

Image
मुंबई-वृत्तसेवा । गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आली असून यामुळे राज्याच्या नागरी भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची मुदत 2021 च्या डिसेंबर महिन्यात संपली असतांना देखील कोरोना असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. तर, यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात आल्या. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2026 च्या अखेरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका/नगरपंचायती; जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. यानुसार आज यातील पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सायंकाळी चार वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्यातील एकूण 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेल्या घोषणेनुसार, आजपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणु...

परतूर येथे बी.रघुनाथ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

Image
परतूर प्रतीनीधी  संतोष शर्मा   येथील आयुर्वेद प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा तिसरा बी.रघुनाथ पुरस्कार सुप्रसिद्ध कथाकार राम निकम यांना जाहीर झाला असून बुधवारी दि. 5 नाव्हे.2025 रोजी  परतूर शहरात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते तिसरा बी.रघुनाथ पुरस्कार राम निकम यांना प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची उपस्थिती असणार आहे. सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा.छबुराब भांडवलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य असणारे डॉ. पृथ्वीराज तौर यांना वाड्मयीन योगदानासाठी रशियातील मॉस्को मध्ये वर्ल्ड्स रायटर्स असोशियन तर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. पृथ्वीराज ...

योगेश डोणे हे पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी ठरताहेत प्रबळ दावेदार...!

Image
परतूर  प्रतिनिधी संतोष शर्मा  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार तयारीच्या मोडमध्ये दिसत आहेत.  अशात योगेश गणेशराव डोणे यांनी वरफळ गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. योगेश डोणे हे नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम अग्रेसर राहुन समस्यांचे निराकारण करणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे नागरीकांसाठी निष्ठेने काम केले असून, दिलेला वेळ, दाखविलेली निष्ठा आणि जनसंपर्क याच त्यांच्या उमेदवरीच्या प्रमुख ताकदी ठरतील, स्थानिकांचा विश्वास आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा कल आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता योगेश गणेशराव डोणे यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत आहे. असा योगेश डोणे यांनी युवा मल्हार सेनेच्या माध्यमातुन अनेक सामाजीक समस्या सोडवून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, शेतकरी सुविधा, सार्वजनिक बांधकामे अशा अनेक योजना प्रत्यक्षपणे राबविल्या...

नगर पालिकेची स्वयंखर्चाने केली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त,पाण्याच्या गंभीर समस्येवर सामाजिक कार्यकर्ते इज्जरान कुरैशीनी साधला तोडगा

Image
परतूर प्रतीनीधी संतोष शर्मा    येथील इंदिरा नगर परिसरात गेली अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत होती. नगर पालिकेकडून यावर कोणताही ठोस उपाय होत नसल्याने, नागरिकांचे हाल होत होते. मात्र, याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते इजरान कुरेशी यांनी पुढाकार घेत, स्वतःच्या खर्चानुसार खराब झालेली पाईपलाईन खराब झाली होती. या पाईपलाईन मध्ये मोठ मोठे दगड जमा झालेले होते. इजरान कुरेशी यांनी तात्काळ याची दखल घेत एक उत्कृष्ट व आदर्श उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर झाली असून, नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान इंदिरा नगर भागात जुनी आणि जीर्ण झालेली पाईपलाईन होती, ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणीगळती होत असे आणि लोकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. कित्येकदा लोकांना पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. नगर पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही, निधीअभावी किंवा इतर कारणांमुळे या कामाकडे दुर्लक्ष झाले होते. सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार....! या गंभीर समस्येची दखल सामाजिक कार्यकर्ते इज...