सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

आनंद डेलिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरचे उदघाटन येत्या रवीवारी ना.राजेश टोपे यांच्या हस्ते

परतूर(प्रतीनीधी) परतूर शहर व ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांची गरच लक्षात घेता शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाच्या सहभागातून आनंद शाळेच्या इमारतीत 'आनंद डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर ' सुरू होत आहे . याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री मा. राजेश भैया टोपे साहेब यांच्या हस्ते दि. 02 मे 2021  रविवार रोजी सकाळी 10 वा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा.प्रदीपदादा सोळंके उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.सुरेशकुमार जेथलिया , मा. राहुल लोणीकर , मा.कपिल आकात, मा. अशोक आघाव  उपस्थित राहणार आहेत. या रुग्णालयासाठी डॉ.प्रमोद आकात, डॉ.भानुदास कदम , डॉ.मुनीर कादरी, डॉ.गजानन केशरखाने , डॉ. कुणाल उढाण , डॉ.शरद पालवे रुग्ण सेवा देणार आहेत. 
          या रुग्णालयात सुरुवातीला 24 ऑक्सिजन व 21नॉन ऑक्सिजन बेड राहणार आहेत. रुग्णांच्या गरजेनुसार यात वाढ केली जाईल. तरी या रुग्णालयाचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम यांनी केले आहे

Comments