सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मंठा येथे छत्रपती शंभूराजे जन्मोउत्सव निमित्त व्याख्यान संपन्न

मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.१७ मंठा येथे जिल्हा परिषद प्रशाला प्रांगणात छत्रपती शंभूराजे जन्मोउत्सव निमित्त संभाजी ब्रिगेड मंठा तर्फे शिवश्री प्रा.गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर वायाळ यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.गंगाधर बनबरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक शिवश्री संजय देशमुख यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री सोमेश घारे यांनी केले. शिवश्री सुदर्शन तारक, यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तर शिवश्री प्राध्यापक गंगाधर बनबरे यांनी प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना श्रोत्यांच्या अंगावर शहारे येतील असे प्रसंग संभाजी महाराजांच्या जीवनातील सांगितले.व आयुष्यात एकही लढाई न हरणारे राजे तसेच आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेऊन जीवन जगावे. आजच्या घडीला काही पक्ष व संघटना देशामध्ये अस्थिरता निर्माण करत आहेत. परंतु आजची जी शांतता प्रस्थापित झालेली आहे.ती शांतता दिसण्याचे एकमेव कारण म्हणजे संभाजी ब्रिगेड ने केलेले समाज प्रबोधन यामुळे याचे सर्व श्रेय संभाजी ब्रिगेडला जाते.संभाजी ब्रिगेड महिला ता.अध्यक्ष सौ.देशमुख उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाला छत्रपती शंभूराजे प्रेमी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सर्व मराठा संघटनेचे पदाधिकारी, व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.संतोष मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत