न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

मंत्री अब्दुल सत्तार याच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन , परतूर राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून सत्तार याचा निषेध


------------------------------
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
       राज्यांचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार याने आदरणीय संसदरत्न खाजदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल बेताल वक्तव्यं केल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.आठ) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, परतूर च्या वतीने अब्दुल सत्तार चा पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून पुतळा जाळण्यात आला.
यावेळी आंदोलनामध्ये नगरसेवक अंकुशराव तेलगड,आरेफ अली,अखिल काजी, विजय राखे, महिला अध्यक्षा उर्मीलाताई खाडे, आरेफ अली, युवक तालुकाध्यक्ष ओंकार काटे,बाळासाहेब घारे,कदिर कुरेशी, रज्जाक कुरेशी, माजी प.स.सदस्य मनोहर पवार,सरपंच सोनाजी गाडेकर, मधुकर झरेकर,कैलाश मुळे,प्रभाकर धुमाळ,
इब्राहिम कायमखानी, लालमिया बागवान,रफिक कुरेशी, निसार चाऊस, इफ्तेकार काजी, परवेझ देशमुख, पंजाबराव अवचार, शाहूराव मुंढे,अखिल पठाण,अनिल बिडवे,मोहन बान,नामदेव पोटे,परमेश्वर पोटे,राजेभाऊ आघाव, अंकुश शिंदे,उत्तमराव पवार,ओ.बी.सी.चे तालुकाध्यक्ष भगवात चव्हण, शहराध्यक्ष राजेश तेलगड, संजय राऊत, दिपक सवने,तुकाराम रुपणार, शाकेर पठाण,संदीप राठोड, कैलाश आकात,महेश नागरे,संतोष साठे,आशिष आकात,तुकाराम खिल्लारे,राहुल खंडागळे,माणिक आण्णा सोळंके,उत्तरेश्वर शेळके,गणेश मावतकर,केशव काळदाते,प्रदीप कादे,ऋषी कराळे,विलास ठोबरे,हरिभाऊ खवल, व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Comments