लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  दि ६ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परतुर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण व शाळा परिसरात स्वच्छता अभियान चे आयोजन करण्यात आले. 
  यावेळी शाळेचे संचालक  संतोष चव्हाण , सुबोध चव्हाण , डॉ. भाग्यश्री चव्हाण ,शाळेचे प्राचार्य जयकुमार सर, प्रा. प्रदीप चव्हाण ,  गजानन कुकडे, श्री. रमेश कदम, श्रीमती मीनाक्षी शिनगारे,श्रीम. वंदना ककरीये, श्रीम. स्वाती काळे, श्रीम. मोनिका लहाने, श्रीम. त्रिवेणी गिरी , श्रीम. मनीषा लहाने, कोमल मोर ,श्रीम. निकिता कदम,  प्रदीप साळवे  विजय भापकर, धनंजय पावले सह इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments