लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा
दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले
दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यांना भोजन देण्यात आले. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी, मानवता आणि सेवाभावाचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचला.
यावेळी नितीन जेथलिया यांनी सांगितले की, "समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करणे, हीच लोकनेत्यांच्या विचारांना खरी अभिवादनाची भावना आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे."
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट, शहराध्यक्ष प्रमोद जगताप, नगरसेवक बाबुराव हिवाळे, राजेश खंडेलवाल, शाकेर खतीब, मंगेश डहाळे, वसीम सय्यद, सिद्धू अंभुरे, दत्ता अंभुरे, गणेश ढवळे, विष्णुपंथ तनपुरे, शाकेरभाई मापेगावकर, अनिल आंबेकर, कम्मू पठाण, मोसीन बागवान, उबाळे, मुजमुले, सुरेश भंडारी, कांतराव सोळंके, बद्रीभाऊ खवणे, डॉ. केशरखाने, संकेत अंभुरे, अजीम पठाण, विशाल पवार, रफिक कुरेशी, सोनू धुमाळ, सौरभ अंभुरे, राहुल अंभुरे, एकनाथ बोनगे, विठ्ठल राऊत, शोएब सिद्दीकी, सचिन बोंबले, अमोल अंभुरे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment