ॲड. सुरेश काळे यांना जाहीर झाला महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार


परतुर प्रतिनिधी- कैलाश चव्हाण
   परतुर वकील संघाचे सचिव ॲड.सुरेश काळे यांना सुप्रीम ह्युमन राईट इंटेलिजन्स इंडिया या संस्थेमार्फत महाराष्ट्र गौरव पुरस्कार मराठवाडा विभागातून घोषित झाला आहे. 
  अहो रात्र दिन, दुबळ्या ,वंचित ,शोषित ,पीडित आदिवासी समूहासाठी पोट तिडकीने व स्वतःला झोकून देऊन काम करणारे असे सर्वसामान्यतून उभा राहिलेले नेतृत्व ॲड.सुरेश काळे यांना नुकताच महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या अनुषंगाने परतुर मंठा विधानसभेचे लाडके आमदार मा.बबनरावजी लोणीकर साहेब यांनी त्यांचा भ्रमणध्वनी द्वारे अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी व मित्रमंडळींनी त्यांना या पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा दिल्या सर्वच स्तरातून या पुरस्काराची चर्चा केली जात आहे. येणाऱ्या 02 मार्च 2025 रोजी नाशिक येथे या पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात