तळणीतील हिंदू संमेलनात एकतेचा जागर— “हिंदू समाज एकत्र आला तरच संकटे नाहीशी होतील” ह भ प गजानन महाराज सपकाळ यांचे प्रतिपादन
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
आज आपल्या भारतमातेवर विविध प्रकारचे प्रहार होत असून ती पूर्णतः सुरक्षित नाही, असे स्पष्ट प्रतिपादन विदर्भ प्रांत धर्मजागरण सांस्कृतिकचे ह.भ.प. गजानन महाराज सपकाळ यांनी केले. २०१४ नंतर हिंदुत्वाचा उदय दिसून येत असला तरी हिंदू धर्मावरील संकटे पूर्णपणे संपलेली नसून ती केवळ पुढे ढकलली गेली आहेत, असे त्यांनी नमूद केले.
ही संकटे पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असून, त्यासाठी हिंदू संमेलनाच्या माध्यमातून जनजागृती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. जगाच्या पाठीवर असलेल्या या हिंदू राष्ट्रावर अनेकांनी आघात केले, तरीही “अनेकतेत एकता” या तत्त्वामुळे भारत आजही ताठ मानेने उभा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
सनातन वैदिक हिंदू धर्माची संस्कृती ही जगासाठी आदर्श असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिले आहे. या भगव्या परंपरेची पताका अखंड तेवत ठेवण्यासाठी जातीपातीच्या भिंती गाडून “आपण हिंदू आहोत” ही भावना दृढ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजची सामाजिक स्थिती अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे. आपल्या शेजारी कोण राहतो, याचीही जाणीव ठेवायला वेळ नाही. एकमेकांचा परिचय नाही, संवाद नाही. परिणामी द्वेष, जात-पात, भेदाभेद वाढत असून आपणच आपल्या भारतमातेला संकटात टाकत आहोत. त्यामुळे सर्वांनी एकसंघ राहणे आणि सामाजिक समरसता प्रस्थापित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी भरतजी देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मनुष्याच्या जीवनातील जन्म आणि संतसहवास या दोन गोष्टी आपल्या हातात नसतात; मात्र कर्तृत्व आपल्या हातात असते. प्रत्येकाने आपले कर्तृत्व सिद्ध करणे गरजेचे आहे. एवढा मोठा हिंदू समाज आज संकटांना का बळी पडतो, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, साधी-भोळी राहणी, उच्च संस्कार आणि जीवनमूल्ये हीच हिंदू संस्कृतीची खरी ओळख आहे. जगाला आजही कसे जगायचे हे भारतातून शिकण्याची गरज आहे.
या वेळी ह भ प भगवान महाराज सरकटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले जातिपातील विखुरलेला समाज एक होत नाही तोपर्यंत आपले लचके कोणीही तोडत राहील हिंदू समाजाचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे या संघर्षामुळेच व आपल्या अवैध संस्कृतीच्या जोरावरच आपण आज टिकून आहोत त्या संस्कृतीला व एकीला आणखी टिकून ठेवण्यासाठी आपल्याला जातीपातीच्या भिंती घालून एक संघ राहावे लागेल ही काळाची गरज आहे
यावेळी व्यासपीठावर ह भ प अर्जुन महाराज बादाड विष्णु महाराज बादाड ज्ञानेश्वर माऊली वाघाळे कर भगवान महाराज सरकटे भरतजी देशपांडे रामेश्वर महाराज गुंड भाऊसिंग जनकवार प्रवीण महाराज खंदारे गजानन महाराज सपकाळ आदींची उपस्थिती होती
---
संघाचा ‘पंचपरिवर्तन’ मंत्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत. या निमित्ताने संघाने समाजाला ‘पंचपरिवर्तन’चा संदेश दिला आहे. त्यामध्ये—
* सामाजिक समरसता
* पर्यावरण संरक्षण
* कुटुंब प्रबोधन
* स्वआधारित जीवन
* नागरिक कर्तव्य
या पंचसूत्रीचा स्वीकार करणे अत्यावश्यक असल्याचे भरतजी देशपांडे यांनी सांगितले.
“एक पाणवठा, एक स्मशान आणि सर्वांना मंदिर प्रवेश” या संकल्पनांमुळेच भारत माता अधिक समृद्ध होईल आणि भारताचे ‘विश्वगुरू’ होण्याचे स्वप्न निश्चितच साकार होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment