लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

समाजाने संतांचे विचार अवगत करावे-प्रदिप फुलमाळी



परतुर/प्रतिनिधी

येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सम्राट आशोक मित्र मंडळाचे संतोष हिवाळेप्रमुख पाहूणे नगरसेवक श्रीकांत उन्मुखे,कृष्णा आरगडे  संदिप काळे  होते.यावेळी चर्मकार महासंघाचे युवा नेते प्रदिप  फुलमाळी यांनी संत रविदास महाराजांच्या कार्याची माहिती दिली. समाजाने जागृत होऊन संत रविदास महाराजांचे विचार अवगत करून युवकांनी उच्च शिक्षणाकडे वळावे जेणेकरुन समाजाची प्रगती होईल.सदर कार्यक्रमाला मुन्ना चित्तोडा,सावता जईद,अजय देसाई, ज्ञानेश्वर जईद,गणेश हिवाळे,शंकर ठाकुर,पत्रकार माणिक जैस्वाल,संजय देशमाने ,आदी उपस्थित होते.
       कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीष हिवाळे,काळे,सुनिल खंदारे आदीनी परीश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत