सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सिध्दार्थ पानवाले,योगेश दुबाले यांचे पीएचडी पात्रता (पेट) परिक्षेत यश.



परतूर(प्रतिनिधी)
 तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतीच पेट  पात्रता परिक्षा डॉ.आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातर्फे घेण्यात  आली.शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्वपुर्ण पदवी पीएचडी मिळविण्यासाठी पेट ही पात्रता परिक्षा असते.
सिध्दार्थ रामचंद्र पानवाले(इंग्रजी) आणि योगेश यशवंतराव दुबाले(फिजिक्स,मटेरिअल सायन्स) या विषयांमधुन पेट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार सुरेशकुमार जेथलीया,मराठवाडा सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव कुणाल आकात,माजी प्राचार्य डॉ.भगवानराव दिरंगे, प्रा.मनवर,प्रा.बिडवे,एकनाथ कदम तसेच विद्यापिठातील डॉ.ह.नी.सोनकांबळे,डॉ विशाल शिरसाठ,डॉ.किशोरवाघ, ॲड.मस्के,ॲड.तथागत पाईकराव,ॲड.विष्णु ढोले,प्रा.संदीप धापसे
सामाजिक क्षेत्रातील  उपनगराध्यक्ष सादेक खतीब,नगरसेवक बाबुराव हिवाळे,सिध्दार्थ बंड, प्रा.प्रविण कनकुटे,महेंद्र बनकर,सिध्दार्थ इंगळे,डॉ.प्रविण दासुद,प्रशांत दासुद,विजय वेडेकर,रमेश पाईकराव,बाबासाहेब वाघमारे,विरेंद्र सातपुते,अर्जुन शेजुळ या सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत