सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापना दिवस आपापल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून साजरा करावा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

 परतूर प्रतिनिधी
 दिनांक 6 एप्रिल  हा भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेचा दिवस कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून स्थापना दिवस साजरा करावा असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे
 माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  भाजपा स्थापना दिवसाच्या शुभमुहूर्तावर आपण  कार्यकर्त्यांनी सर्व बुथ वर मोठ्या उत्साहाने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून व  यानिमित्त मिठाई व फळ वाटप करून आनंद उत्सव साजरा करावा भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाची वैभवशाली परंपरा व गौरवशाली इतिहास या विषयावर चर्चासत्रे किंवा वर्च्युअल सभा आयोजित करून देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेली विविध विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे आवाहन सदरील पत्रकात करण्यात आलेले आहे
       हे कार्यक्रम करत असताना  कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत स्थापना दिवस  साजरा करावा असे या पत्रकात म्हटले आहे.
     पक्षाचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी बरोबर कार्यकर्ते त्याच बरोबर बुथस्तरालावरील सर्वांनी हा उत्सव साजरा करण्याचे ही श्री लोणीकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
      भारतीय जनता पार्टीच्या उभारणीपासून ते आज पर्यंत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे या योगदानाचे स्मरण करीत सर्वोच्च पातळीवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा गौरव वाढवण्यासाठी आपण सर्वांनी स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्याचे त्यांनी म्हटले आहे
===================================

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत