हातडी येथे सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली =================


परतूर / हनुमंत दवंडे

परतूर तालुक्यातील हातडी येथे सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळ व सर्व महिला ग्राम संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून   ,पोलीस कॉन्स्टेबल निता नवले 
 निता नवले (महिला पोलीस कॉन्स्टेबल ) गंगाताई जोगदंड (महीला बचतगट सुपर वायसर)सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गाढवे,उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड  सरपंच, उपसरपंच, सर्व ग्राम पंचायत महिला सदस्या, आरोग्य सेविका  आशा कार्यकर्ती   शाळेतील विद्यार्थी व हातडी येथील ग्रामस्थ यांची उपस्तीती होती या वेळी संस्कृती झरेकर, स्वरा झरेकर, शारदा बोरकर, संस्कृती बोरकर यांनी यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरवात केली .  या नंतर पोलीस कॉनीस्टेबल निता नवले  यांनी मार्गदर्शन केले बोलतांना त्या म्हणाल्या मुलींनी शिक्षणावर भर द्यावा कोणीही बालविवाह करू नये महिलांवर कौटोंबिक अत्याचार होत असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा   या नंतर समता कलामंच येनोरा यांनी लेक वाचवा लेक शिकवा ,ही शैक्षणिक नाटिका सादर केली  या मध्ये हरिभाऊ गायके, शरद साळवे, गणेश घोडे सो पवन घोडे, श्रद्धा वाघमारे भास्कर साळवे, अर्जुन नबाजी गाढवे गजानन गोरे  यांनी सहभाग घेतला.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान