सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश मुंडलिक यांची निवड



मंठा (सुभाष वायळ )जालना येथील स्व.अनिल जिंदल नगर परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व रवि अंबुले यांनी नियुक्तीपत्राद्वारे केली आहे.दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की,आपल्या अंगी असलेल्या नेतृत्वगुण व शैक्षणिक तळमळीमुळे आपली नियुक्ती करण्यात येत आहे.आपल्या अनुभवाचा व योग्यतेचा आपल्या लढ्याला व शैक्षणिक प्रगतीला निश्चित उपयोग होईल अशी अपेक्षा करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.मुंडलिक यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सुभाष वायाळ,भारत सवणे,गणेश कानडे , सतिश राठोड, श्रीकांत ठाकरे, रवि शेळके,विश्वास मिसे,सचिन तिरपुडे,अतुल तलवारे,नितीन राऊत,मोहन नायसे,महेश इंगोले,शरद नागरगोजे,राजू गायकवाड अशोक पवार,प्रकाश राठोड,बालासाहेब मुंडे,सतीश राठोड,गोविंद कातारे,मोहन कदम,अरुण गुंजकर,सौरभ बगडीया,निहित सकलेचा,मनिष अग्रवाल,लक्ष्मीकांत सवणे,पुष्पक सारस्वत,नरेश गायके,गोविंद पांगरकर,रविंद्र काळे,संदीप जगताप यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत