सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पूज्य रामबिलास जी होलानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तीरंगा झेंड्या चे वाटप

परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे
पूज्य रामबिलास जी होलानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माननीय पंतप्रधान व केंद्र सरकार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या मोहिमेला हातभार लावण्यासाठी पतसंस्थेच्या वतीने झेंड्याचे वितरण आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत राखे हे होते. 
     या कार्यक्रमात सहभागी लोकांना तिरंगा झेंड्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मिठाईवाटप करण्यात आले. या कार्यक्रमात नवीन मोंढ्यातील व्यापारी, माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य,रामबिलासजी होलाणी पतसंस्थेचे अध्यक्ष दिनेश होलाणी,सर्व संचालक पतसंस्थेचे कर्मचारी पत्रकार व लॉयन्स क्लबचे सदस्य व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परतु शहरातील सर्व माजी सैनिकांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन महेश होलाणी यांनी केले .याप्रसंगी मनोहर खालापुरे ,अजय देसाई तुकाराम उबाळे व प्रशांत राखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत