सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर येथे खासदार फंडातून वार्ड क्रमांक 10 मध्ये गणपती मंदिराच्या सभा मंडपाचे उद्घाटन संपन्न


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. बंडू ( संजय ) जाधव यांच्या खासदार फंडातून शिवसेना युवा नेते महेश नळगे यांच्या प्रयत्नाने परतुर येथील वार्ड क्रंमाक १० मधील गवळी गल्ली गणपती मंदिराच्या सभामंडपाचे उद्धघाटन शिवसेनेचे जेष्ठ नेते रामेश्वर  नळगे व शिवसेना चे उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम यांच्या हस्ते झाले. 
     याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाप्रमुख   अशोकराव आघाव , शहरप्रमुख श्री .दत्ता पाटील सुरूंग पत्रकार राजू भारूका ,युवा शहर प्रमुख राहुल कदम, विकास खरात ,  वार्डातील जेष्ठ नागरिक किसन ऐकिलवाले ,प्रकाश माने, व तरुण मित्र मंडळी दत्ता ऐकीलवाले, राजाराम ऐकिलवाले, सुनिल अंभुरे, आशोक काळे, तुकाराम घाडगे ,गोपाल माने, रामेश्वर जगताप, शाम ऐकिलवाले, डिगाबर ऐकिलवाले ,गोविंद माने, मधुकर ऐकिलवाले, शंकर गायकवाड ,नारायण गायकवाड, सोमनाथ घाडगे ,सुरेश माने, महादेव ऐकिलवाले, जनक जाधव ,अमोल ऐकिलवाले, गोपीनाथ जगताप ,लक्ष्मण माने, कैलास काळे ,विनोद जाधव, दीपक ऐकिलवाले ,दगडू घोडे, अशोक घाडगे, रामजी ऐकिलवाले‌ ,कृष्णा गायकवाड, नारायण जगताप ,ज्ञानेश्वर घाडगे, सागर शेलार ,लल्ला अंभोरे, गणेश ‌ऐकिलवाले, वैजनाथ गायकवाड ,अमोल काळे, विजय शेळके ,व जगातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत