सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सद्गुरू संत श्री सेवालाल महाराजांचे जीवन कार्य प्रत्येकाने अंगीकारावे - भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन


परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
      प्रत्येकाच्या आयुष्यात संतांची शिकवण मार्गदर्शक ठरत असते प्रत्येक व्यक्तीने आपली स्वतःची ओळख निर्माण करून स्वतःसह समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा त्यासाठी संत सद्गुरू सेवालाल महाराज यांचे जीवन कार्य प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावे असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी आज केले.
मंठा तालुक्यातील कर्णावळ येथे संत सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी श्री राहुल लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर महंत योगानंद महाराज,
गणेशराव खवणे, सतीश निर्वळ, पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, नागेश घारे, सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

संतांच्या सानिध्यात मोक्ष आणि सद्गती प्राप्त होते त्यामुळे उपदेशाप्रमाणे आपले जीवनकार्य चालवावे त्यासोबतच समाजासह गावाच्या विकासावर देखील भर द्यावा संतांनी महंतांच्या सूचनांचे पालन करावे त्याशिवाय तरणोपाय नाही असेही यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले.

सत्संगतीचा महिमा अपार आहे. सत्संगतीने आपल्या सद्बुद्धीत वाढ होते. यासाठी संतांची संगती करायला शास्त्रात आग्रहपूर्वक सांगितले आहे. संताचा प्रत्यक्ष सहवास मिळाला तर उत्तमच संतसंगतीमुळे आत्मज्ञानाची तळमळ शांत होण्यास मदत होते तसेच संतांच्या संगतीने आध्यात्मिक प्रगती साधता येते. त्यासाठी प्रत्येकाने सदगुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्य अंगिकरावे असेही राहुल लोणीकर यावेळी म्हणाले.

यावेळी उद्धव पवार, अविनाश चव्हाण, नागेश घारे, विठ्ठलराव काळे, प्रसादराव बोराडे, माऊली गोंडगे, विलास घोडके, राजेभाऊ खराबे, सुभाषराव बागल, नवनाथ चट्टे, मनोज देशमुख, ज्ञानेश्वर राठोड, भगवान राठोड, कैलास चव्हाण, भीमराव राठोड, नायबराव गोंडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती...

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत