सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

भाजयुवा मोर्चा व बंजारा ब्रिगेड कडून एकनाथ खडसे चा निषेध


परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
       परतूर तालुक्यातील श्रीष्टी तांडा येथे राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव  च्या सभेमध्ये बंजारा समाज बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे की बंजारा समाज २किलो मटण व एक दारू ची बाटली मधे विकले जातात असे वक्तव्य करून एकनाथ खडसे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील बंजारा समाजाचा आपमन केला
     बंजारा समाजाबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल एकनाथ खडसे यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल बंजारा समाजाकडून या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत आहे व याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल  एकनाथ खडसे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची व बंजारा समाजाची माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल या वेळी एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुर्दाबाद चे नारे देण्यात आले  या वेळी युवा नेते अर्जुन राठोड ,पत्रकार कैलास चव्हाण,नितीन राठोड,अजय चव्हाण , महेश राठोड,राहुल राठोड,उमेश राठोड, हे सर्व जण उपस्थित होते


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल 

अर्जुन राठोड युवा नेते युवा मोर्चा

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत