सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

नांदेडच्या ऐतिहासिक धम्म सोहळ्याचे साक्षीदार व्हा - राहुल नाटकर

परतूर / (प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
दिल्ली मध्ये मध्यतंरी धम्म दिक्षेचा सोहळा पार पडला.त्या मध्ये २२ प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले.या २२ प्रतिज्ञावरुन देशभरात वादळ माजतय अशी परिस्थिती आहे. वैदीक हींदु संघटना व त्याचे प्रतिनिधींची २२ प्रतिज्ञावर बंदी आणावी अशी भुमीका आहे. गुजरातच्या निवडणुका होई पर्यंत बंदी येणार नाही.परंतू गुजरातच्या निवडणुकि संंपल्या की बंदी येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने विचार करता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नांदेड येथे ५ नोव्हेबंरला धम्म अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. 
      सर्व आबेडकरवादी आणी ज्यांनी ज्यांनी दिक्षा सामारोह पार पाडलेला आहे.त्यांनी लाखोच्या संख्खेने उपस्थित राहणे क्रम प्राप्त आहे. असे जाहीर आव्हान परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर सह रविंद्र भदर्गे, रोहण वाघमारे , बाबु गोस्वावी आशोक ठोके, लिंबाजी कदम प्रदीप साळवे,दीपक हिवाळे आकाश मुंढे व आदी कार्यकर्त्योनी दिलेल्या प्रसिध्दी पञकाद्वारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत