सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांच्या मागणीला यश-अशोक तनपुरे

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
भारतात प्रथम महाराष्ट्रात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना दिव्यांगाच्या कल्याणासाठी व इतर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी मंत्रालयामध्ये दिव्यांगासाठी माजी राज्यमंत्री बच्चु कडू गेल्या कित्येक वर्षापासून दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे
      यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांनी विविध प्रकारचे आंदोलने मोर्चा उपोषण केले  मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्या असून जागतिक अपंग दिनाच्या दिवशी 3 डिसेंबर रोजी स्थापन होणार आहे अशी माहिती माझी राज्यमंत्री आमदार बच्चु कडू यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना माहिती दिली याबद्दल दिव्यांग्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चु कडू यांचे दिव्यांगाच्या वतीने आभार मानले व आनंद व्यक्त केला आसल्याचे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी दिलेल्या एका पत्रकामध्ये म्हटले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत