सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी शेषराव वायाळ ,सचिव सुरेश कवडे तर कार्याध्यक्ष पदी अर्जुन पाडेवारयाची बिनविरोधी निवड,


परतूर /प्रतिनिधी
परतूर पत्रकार संघाची गुरुवार ता.22 रोजी येथील शासकीय विश्रांम गृहात मावळते अध्यक्ष शामसुंदर चितोडा व योगेश बरीदे याच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी मागिल कार्यकारणी संपुष्टात आणून नूतन  कार्यकारणी घोषित करण्यात आली.
यामधे  अध्यक्ष पदी शेषराव वायाळ, सचिव सुरेश कवडे कार्याध्यक्ष पदी अर्जुन पाडेवार याची  बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर प्रवक्ते पदी कैलासराव सोळके, उपाध्यक्ष पदी  संतोष अखाडे,संजय देशमाने,सहसचिव माणिक जैस्वाल,कोषाअध्यक्ष सरफराज नाईकवाडी, सह कोषाध्यक्ष सय्यद तय्यब ,याची निवड करण्यात आले.यावेळी पत्रकार सय्यद वाजेद, मनीष अग्रवाल,इम्रान कुरेशी, सुरेश शिंदे, कैलास चव्हाण,शेख असेफ,प्रभाकर प्रधान,राजकुमार भारूका,राहुल मुज़मुले, शिवकुमार भारूका,माजेद ,तारेक,शाम सोनी,अजय कांबळे,सु.द.शिवनगिरीकर,शे.अथर,मोईन पाशा ,पांडूरंग शेजूळ कृष्णा धोंगडे आदीची उपस्थिती होती.....


Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत