परतूर येथे महिला अत्याचाराविरोधात भाजपा महिला आघाडीचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन* ======================= *सरकार महिला अत्याचाराबाबत गंभीर नाही* *आमदार लोणीकर यांचा आरोप* ======================= *महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी*

परतूर प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकार महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भात गंभीर नसल्याचा आरोप माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे पुढे या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील गृहखाते संवेदना हरवलेले असून गृहमंत्र्यांची या गोष्टीकडे लक्ष नसल्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी बलात्कार अत्याचार विनयभंग अशा प्रकार चा अन्याय महिलांवर होत असून  कोविड सारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव राज्यभरात असताना पनवेल येथे कोविड  सेंटरमध्ये 40  वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा बलात्कार होतो ही गोष्ट अतिशय घृणास्पद असून राज्यात होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यात हे सरकार अपयशी ठरले असून सरकारला महिलांच्या बाबतीत कुठल्याही गोष्टीची घेणंदेणं नसल्याचे ही ते म्हणाले

  राज्यातील सरकार कुंभकर्णी झोपेत असून ,महिला अत्याचार,अतिवृष्टी, महापूर या मुळे जनता हैराण असून सरकार मात्र या कडे डोळझाक करीत असल्याचे ते म्हणाले.

  हे सरकार संवेदनाशुन्य असून या सरकारला जनतेनेच दुःख समजून घेत नसल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष असल्याचे सांगतानाच कोरोना सारख्या संवेदनशील विषयावर सरकार गंभीर नसून सरकारला महिलांचे दुःख दिसत नाही, वाढलेले अत्याचार ही अतिशय दुर्दैवी बाब असून महिलांना न्याया साठी रस्त्यावर उतरवण्यावच महापातक या सरकार चे  असून सरकार कुठल्याच प्रश्‍नावर भूमिका घेत नसल्याने जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे ही ते म्हणाले

  *परतूर तहसील समोर भाजपा महिला आघाडीचे जोरदार आंदोलन*

परतूर येथील तहसील कार्यालयासमोर माजी मंत्री बबनराव लोणीकर, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस राहुल लोनिकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला आघाडी च्या वतीने जोरदार निदर्शने करीत ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकार च्या नाकर्तेपणा मुळे महिलांवर अत्याचार वाढले असल्याचे तहसीलदार यांना देण्यांत आलेल्या निवेदनात म्हंटले असून, पुढे या निवेदनात म्हंटले आहे की,भाजपच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी दि 22 रोजी महाराष्ट्रभर महिला अत्याचाराच्या विरोधात राज्यभरात आंदोलन केले होते मात्र ठाकरे सरकारने या विषयावर कुठले ही पाऊल उचलले नाही या  विरोधात भाजपा जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव, परतूर पंचायत समितीच्या सभापती मंकरणा ताई येवले, पंचायत समिती सदस्य अनिताताई पाईकराव, भाजपा सरचिटणीस सिंधुताई  बेरगुडे,  त्याचबरोबर भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, भाजयुमोचे सरचिटणीस रवी सोळंके बंडू मानवतकर सरपंच सोमनाथ मगर सुधाकर बेरगुडे पेंटर कवडे सरपंच अर्चना मगर शीलाताई पवार कावेरी पवार जया ताई भांडवलकर मीनाक्षी ताई मगर  यासह  अनेक महिलांची  उपस्थिती या ठिकाणी होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती