न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

दिलीप काका तौर यांच्या निधनाने जालना जिल्हा भाजपात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली- भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

घनसाांवगि (प्रतीनिधी)
दिलीप काका तौर यांच्या निधनाने जालना जिल्हा भाजपा मध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली असून ती पोकळी केव्हाही भरून निघणार नाही दिलीप काका च्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अनेक मार्गदर्शक सूचना त्यांच्याकडून लागल्या राजकीय क्षेत्रात काम करताना त्या सूचना वेळोवेळी कामी पडल्या

सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष एस टी महामंडळाचे संचालक यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिलीप काकांनी पार पडल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यालय उभारण्यात दिलीप काका यांचा मोलाचा वाटा होता

तौर परिवाराच्या या दुःखद प्रसंगात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व्यक्तीशः मी  आणि माझे लोणीकर कुटुंबीय सहभागी आहोत हे दुःख पेलण्याची शक्ती दिलीप काकांच्या परिवाराला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत