न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

दिलीपराव तौर यांच्यासारख्या लढवय्या माणूस, एक सच्चा मित्र, स्पष्टवक्ता आणि पक्षासाठी निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता गमावला- माजीमंत्री बबनराव लोणीकर

घनसांवगि (प्रतीनिधी)
दिलीपराव तौर यांच्यासारख्या लढवय्या माणूस, एक सच्चा मित्र, स्पष्टवक्ता आणि पक्षासाठी निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता गमावला आज आम्ही गमावला आहे. लिंबी तालुका घनसावंगी या छोट्याशा गावातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करणारे दिलीपराव भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ते, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष या पदावर त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांशी दिलीपरावांची खूप जवळीकता होती युती सरकारच्या काळात परिवहन महामंडळाचे संचालक म्हणून देखील त्यांनी मोठं काम केलं आहे.

दिलीपराव तौर हे निडर आणि प्रचंड स्पष्टवक्तेपणा असणारे नेते होते पक्षात असो की पक्षाबाहेर जी बाब पक्षविरोधी असेल त्या बाबीला प्रचंड विरोध करण्याची क्षमता आणि ताकद दिलीपराव यांच्यामध्ये होती, कुशल मार्गदर्शक, दुर्दम्य इच्छाशक्ती, खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची ताकद असणारा मित्र आज आज मी गमावला आहे.

दिलीपराव यांचा मुलगा ॲड.गणेश तौर नक्कीच पुढे दिलीपराव यांचा वारसा चालवेल.
तौर कुटुंबियांवर आज दुःखाचा खूप मोठा डोंगर निर्माण झाला आहे, त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर तौर कुटुंबियांना देवो.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत