न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

तहसील कार्यालय ते काँलेज रोड दुरूस्ती करण्याची पाडेवार यांची मागणी,


परतुर( प्रतिनिधी) परतुर शहरातील मुख्य रस्ता असलेला बसस्थानक , अग्निशामक दल, तहसिल कार्यालय ते काँलेज रोडवरील खड्डे बुजवून रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी उपविभाग आधिकारी परतुर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे,
 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतूर शहरातील एकमेव असलेला मुख्य रस्ता म्हणजे तहसील कार्यालय ते कॉलेज रोड ,मार्गे जाणारा रस्ता हायवे ला जोडणारा आहे तो रस्ता   अनेक दिवसांपासून खराब झालेला आहे, या रस्त्याच्या मध्यभागी जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून कोणता खड्डा चुकवा असे वाहन चालकांना कळत नाही या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच शहरातून परतुर ते मुंबई बस सुरू झाली असून ,या खराब रस्त्यामुळे बस चालकाला बस चालवणे देखिल कठीण झाले आहे, रस्त्यावरील पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यात घाण पाणी साचलेले असुन पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे, सदर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी ही दिलेल्या निवेदनात अर्जुन पाडेवार यांनी केली आहे,

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत