सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण. ,आपण लवकर बरे होऊन जनसेवेसाठी पुनश्च वाहून घ्यावे,ही पांडुरंगाकडे प्रार्थना - माजी मंत्री बबनराव लोणीकर


आमचे सर्वांचे लाडके नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना कोविड- 19 ची लागण झाली असून, जनसेवेला ईश्वर सेवा मानणारे  देवेंद्रजी लवकरच या आजारातून सुखरूप पने बाहेर येऊन पुनश्च जनसेवेला वाहून घेतील असे साकडे आपण पांडुरंगाकडे घातले असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हंटले आहे.
  कोरोना संकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देवेंद्रजीनी जनतेला या संकट काळा मध्ये चांगले उपचार मिळावेत म्हणून राज्यभरातील अनेक कोविड सेंटर ला भेटी दिल्या तेथील रुग्णांची आस्थेने चौकशी करीत धिर दिला. सुविधा मध्ये चाल ढकल होत असल्याचे सरकार च्या लक्षत आणून देत ठिकठिकाणी बैठका घेत जनतेवर आलेल्या या संकटात खंबीरपणे उभे राहून सामना केला मुंबई असेल पुणे असेल की आपलं औरंगाबाद महानगर असेल स्वतः कोविड सेंटर ला भेटी देऊन योग्य उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या अश्या असामान्य कर्तृत्ववान नेत्याला कोरोना ची लागण झाली असून लवकरच ते या संकटातून सुखरूप बाहेर येतील असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला आहे.
     कोकणात चक्रीवादळ झाले, विदर्भात ढगफुटी झाली आणि मराठवाड्यात अतिवृष्टी मुळे ओला दुष्काळ पडला या गंभीर परिस्थितीत जनतेला धीर देण्यासाठी जीवाची तमा न बाळगता देवेंद्रजी वाडी ,वस्ती ,तांडा आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि जनसामान्यांना धीर देत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकार ला धारेवर धरले
   आशा धीरोदात्त उत्तुंग नेत्याला पांडुरंग निश्चित पणे लवकर बरे करून दिन,दलित,पीडित, उपेक्षित, शेतकरी, शेतमजूर यांची सेवा करण्या साठी पुनश्च रुजू करील अशी प्रार्थना माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत