सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी -शिवसेना

    परतुर प्रतिनीधी  :      केंद्राने डिझेल व पेट्रोल ची दरवाढ केल्याच्या निषर्थात व तसेच कृषि विधेयकाच्या विरोधात दिल्लीत 
चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामाघे पाकिस्तान आणि चीन चा हात असल्याचे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या खळबळजनक वक्त्याव्यच्या  निषेधार्थ शिव सेने च्या     वतीने त्रीव शब्दात निषेत व्यत्त करत  महादेव मंदीर चौकात   आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी 'रावसाहेब दानवे यांणी माफी मागा' अशा घोषणा देण्यात आल्या व निदर्शने करण्यात आले व त्यांनतर उपविभीय कार्यलयात जाऊन निवेदन देण्यात आले यावेळी शिव सेना   तालुका प्रमुख अशोक अघाव, उपजिल्हा प्रमुख माधवराव मामा कदम, शिव सेना शहर प्रमुख   दत्ता  पाटील सुंरूग राजकुमार भारूका अजय देसाई  दलीत आघाडी तालुका प्रमुख मधुकर पाईकराव भारत पंडीत रामचद्र  काळे आबा कदम विठ्ठल वटाने शुभम दिंडे बाबुराव बोरकर जगन टेकाळे ञ्रानेश्रर शेळके माऊली राजबिंडे तुकारम बोरकर कालीदास सांवत राहुल कदम गोपील माने अरून धुमाळ गोंवीद रसाळ अदी शेतकरी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्तीत होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत