परतूर वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड.बागल तर सचिवपदी जमीनदार


परतूर प्रतिनिधी - परतूर वकील संघाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ऍड.जगन्नाथ बागल  सचिवपदी ऍड.वसीम जमीनदार तर ग्रंथालय सचिवपदी ऍड.नितीन मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  वकील संघाच्या सभागृहात ऍड. राजेश अंभुरे,व ऍड. राजेश पाईकराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष बैठकीत २०२१ या नव्या वर्षाची वकील संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. 
    यावेळी जेष्ठ वकील ऍड.झेड.ऐन.कादर,अनिल देशपांडे,राजेश अंभुरे,ऐ.जे.देशमुख, व्ही.व्ही.बेरगुडे,बी.बी.चिखले,दीपक डहाळे,ऐ. व्ही. दराडे,अभय जवळेकर,राहुल लिंबूळकर,ओमप्रकाश राऊत,पी.डी. चव्हाण,अविनाश चामणीकर,अनंतराव मस्क,राजेश पाईकराव, पुरी मॅडम,महेंद्र वेडेकर, सुनील देशपांडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात