सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

दिपक शिंदे यांची चर्मकार विकास संघाची युवा कार्याध्यक्ष पदी निवड


परतुर प्रतिनिधी शहरातील सामाजिक कार्यकर्ता दिपक शिंदे यांना महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर यांनी एका प्रसिद्धि पत्रकद्वारे चर्मकार विकास संघाची युवा कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे या निवड करते वेळीस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की अपन सामाजिक बाँधीलकीतुन चर्मकार समाजाच्या विकास सुख दुःख न्यायहकक व समान्याच्या सर्व स्तारावरकार्यरत आहात अपन केलेल्या सर्वगीन कार्याचा विचार करुण या पुढे चर्मकार विकास संघ युवा कार्याध्यक्ष परतुर या पदा वर पुढील आदेशापर्यंत नेमनुक करण्यात येत आहे आपणास नियुक्ति केलेल्या पदाची जबाबदारीपूर्वक संघटने च्या ध्येय धोरणा नुसार व समाज हिताच्या कामातून योग्य न्याय देऊन यशस्वी पणे कार्य कराल अशी सार्थ अपेक्षा केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देन्यात आली दिपक शिंदे यांची निवड बदल सर्व मित्रा नी पन शुभेच्छा व्यक्त केली

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत